CJP मध्ये फूट; ‘कॉकरोच जनता पार्टी लोकतांत्रिक’ या नव्या पक्षाची स्थापना


CJP मध्ये फूट; ‘कॉकरोच जनता पार्टी लोकतांत्रिक’ या नव्या पक्षाची स्थापना

नवी दिल्ली :कॉकरोच जनता पार्टी (CJP) मध्ये फूट पडल्याचा दावा करण्यात आला असून, मनीष ब्रह्मदत्त यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी लोकतांत्रिक’ (CJP लोकतांत्रिक) या नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली आहे.
नव्या पक्षाची घोषणा करताना मनीष ब्रह्मदत्त यांनी मूळ CJPच्या नेतृत्वावर गंभीर आरोप केले. मूळ CJPचे नेतृत्व करणारे दीपके हे आम आदमी पार्टीचे (AAP) नेते अरविंद केजरीवाल यांच्या सांगण्यावरून काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपला विरोध करणे हाच CJPचा प्रमुख उद्देश राहिल्याचा दावाही ब्रह्मदत्त यांनी केला.
तसेच, मूळ CJPला इतर राज्यांतील विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांशी आता काहीही देणेघेणे राहिलेले नाही, असा आरोपही त्यांनी केला. या पार्श्वभूमीवर जनतेचे प्रश्न आणि लोकशाही मूल्यांना प्राधान्य देण्यासाठी ‘CJP लोकतांत्रिक’ची स्थापना केल्याचे ब्रह्मदत्त यांनी सांगितले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!