राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची तीन मुलांसह दरीत उडी; दोन मुलांसह मृत्यू, मुलगी गंभीर
धाराशिव :धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्यावरून राष्ट्रीय महिला कुस्तीपटू अश्विनी पौळ यांनी आपल्या तीन लहान मुलांसह सुमारे १०० फूट खोल दरीत उडी मारल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत अश्विनी पौळ यांच्यासह त्यांचा मुलगा अजिंक्य आणि मुलगी क्रांती यांचा मृत्यू झाला, तर दुसरी मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या त्रासाला आणि जाचाला कंटाळून अश्विनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप त्यांच्या वडिलांनी केला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
या घटनेमागील नेमके कारण काय, तसेच सासरच्या जाचाच्या आरोपात तथ्य आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





