विद्यानंद बापट यांच्यावरील हल्ल्याची मुख्यमंत्र्यांकडून दखल; पोलीस संरक्षण देण्याचे आदेश
पुणे :पुण्यात गणेशोत्सवातील डीजेच्या दणदणाटाला विरोध करणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर गुरुवारी झालेल्या हल्ल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृह विभागाने गंभीर दखल घेतली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार विद्यानंद बापट यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेचे सभागृह नेते गणेश बिडकर यांनी दिली. दरम्यान, बापट यांच्यावर हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
डीजेच्या मोठ्या आवाजाविरोधात भूमिका घेतल्याने बापट यांच्यावर हल्ला झाल्याचे सांगण्यात येत असून, या घटनेमुळे गणेशोत्सवातील ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 70







