विनापरवानगी शाळांना भेटी दिल्यास CJP कार्यकर्त्यांवर गुन्हे; मुंबई पोलिसांचा थेट इशारा


विनापरवानगी शाळांना भेटी दिल्यास CJP कार्यकर्त्यांवर गुन्हे; मुंबई पोलिसांचा थेट इशारा

मुंबई :शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विनापरवानगी जाऊन पाहणी करणाऱ्या ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP)च्या कार्यकर्त्यांना मुंबई पोलिसांनी थेट इशारा दिला आहे. शाळा व्यवस्थापनाकडून तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित कार्यकर्त्यांविरोधात थेट गुन्हा दाखल करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी दिला आहे.
शाळा आणि महाविद्यालये ही विद्यार्थी व शिक्षकांसाठीची शैक्षणिक ठिकाणे आहेत. त्यामुळे कोणतीही अधिकृत परवानगी नसताना CJPच्या नावाखाली शैक्षणिक संस्थांमध्ये जाऊन पाहणी करणे अथवा आंदोलन करणे टाळावे, अशी भूमिका पोलिसांनी स्पष्ट केली आहे.
दरम्यान, विनापरवानगी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करून पाहणी किंवा आंदोलन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!