मुंबईत गणेशोत्सवात डीजे आणि लेझर लाईट्सवर बंदी कायम; गणेश मंडळांची पोलिसांना ग्वाही


मुंबईत गणेशोत्सवात डीजे आणि लेझर लाईट्सवर बंदी कायम; गणेश मंडळांची पोलिसांना ग्वाही

येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत डीजे आणि प्रखर लेझर लाईट्सच्या वापरावरील बंदी कायम राहणार आहे. ध्वनिप्रदूषण तसेच नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला असून, पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या बैठकीत गणेशोत्सव मंडळांनीही डीजे आणि लेझर लाईट्सचा वापर न करण्याची ग्वाही दिली आहे.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांनी मोठ्या आवाजातील डीजे आणि प्रखर लेझर लाईट्समुळे होणाऱ्या त्रासाबाबत आवाज उठवला होता. त्यानंतर या विषयावर व्यापक चर्चा सुरू झाली होती. ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण ठेवण्याबरोबरच प्रखर लेझर लाईट्समुळे डोळ्यांना होणाऱ्या संभाव्य धोक्यांचा विचार करून प्रशासनाकडून कठोर भूमिका घेण्यात आली आहे.
मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांनी सर्व गणेशोत्सव मंडळांना नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवत यंदाचा गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने, उत्साहात आणि शांततेत साजरा करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


50
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!