टाकळीभान टेलटैंक एक पर्यटनस्थळ व्हावे- आविनाश आदिक

टाकळीभान (प्रतिनिधी)-श्रीरामपूरच्या पूर्व भागाला वरदान ठरलेला टाकळीभान टेल टैंक एक पर्यटन स्थळ व्हावे असे उद्गार अविनाश आदिक यांनी काढले. टाकळीभान टेल टैंक (गोविंद सागर) चे पूजन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक बोलत होते. याप्रसंगी माजी आ. लहू कानडे, श्रीरामपूरच्या माजी नगराध्यक्ष अनुराधा ताई आदिक, अरुण पाटील नाईक व गावातील मान्यवर पदाधिकारी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आदिक म्हणाले की राहुरी तालुक्यातील मुसळवाडी डॅम टाकळीभान टेल टॅकचे सुशोभीकरण होऊन टाकळीभान टेल टँक एक पर्यटन स्थळ व्हावे अशी अपेक्षा अविनाश आदिक यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी आमदार लहू कानडे यांनी स्व. गोविंदराय आदिक यांच्या दूरदृष्टीतून तयार झालेला टेल टैंक आसपासच्या दहा-बारा गावाची तहान भागवणारा मुख्य स्रोत आहे. अशा भरीव कामामुळे पिढ्या न पिढ्या पिण्याच्या पाण्यासाठी शेतीसाठी याचा फायदा व लाभमिळत आहे.
याप्रसंगी टाकळीभान टेल टैंक तलावाच्या पाण्याची वसाडी चोळी व श्रीफळ वाढवून पूजन अविनाश आदिक, अनुराधाताई आदिक व माजी आ. लहू कानडे यांच्या हस्ते पार पडले.
याप्रसंगी भाकचंद औताडे, राष्ट्रवादी किसान सभेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कोकणे, माजी सरपंच सचिन पवार, जयकर मगर सर, हंसराज आदिक, देविदास कोकणे, तंटामुक्ती अध्यक्ष आबासाहेब रणनवरे, नितीन गवारे, भाऊसाहेब वाघ, दिलीपराव कोकणे, भास्करराव कोकणे, काका डिके, पोपटराव पटारे, भारत जाधव, ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे, अशोकराव रणनवरे ,अर्जुन राऊत, मच्छिन्द्र पटारे, गजानन कोकणे अनिल बोडखे, दत्तात्रय लोखंडे, बंडूपंत बोडखे, संदिप चोरगे, मधुकर गायकवाड, अनिल कोकणे, बंडू तात्या पटारे, बापूसाहेब पटारे, दादासाहेब कोकणे, राजेंद्र माने, दत्तात्रय मगर, बबनराव, मगर, शन्करराव पवार, भैय्या पठाण, बबलू वाघुले, कृष्णा तहऱ्हाळ, तसेच पाटबंधारे विभागाचे अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते,
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर







