जम्मू-काश्मीरमधून पळून आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना दौंड लोहमार्ग पोलिसांकडून सुरक्षित ताब्यात; पालकांकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू


जम्मू-काश्मीरमधून पळून आलेल्या तीन अल्पवयीन मुलांना दौंड लोहमार्ग पोलिसांकडून सुरक्षित ताब्यात; पालकांकडे सोपवण्याची प्रक्रिया सुरू

​दौंड:जम्मू-काश्मीर येथून पळून आलेली तीन अल्पवयीन मुले झेलम एक्सप्रेसने प्रवास करत असल्याची गुप्त माहिती मिळताच दौंड लोहमार्ग पोलिसांनी अत्यंत सतर्कतेने व तत्परतेने कारवाई करत तिघांनाही सुरक्षितरीत्या ताब्यात घेतले आहे.
​दिनांक ०४/०९/२०२६ रोजी नियंत्रण कक्ष लोहमार्ग पुणे यांनी द ठाणे अंमलदार व हवा १३७ जगताप यांना संदेशाद्वारे माहिती दिली होती की, रेल्वे गाडी नंबर ११०७८ झेलम एक्सप्रेस या रेल्वे गाडीने जम्मू-काश्मीर येथील तीन अल्पवयीन मुले पळून आलेली आहेत. सदर प्रकरणी सखीर भवानी पोलीस स्टेशन (राज्य जम्मू आणि काश्मीर) येथे FIR No 26/2026 u/s 137 (2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे कळवण्यात आले.
​माहिती मिळताच परिस्थितीचे व गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पावले उचलली. पोलीस हवालदार ३३४ कोंगे, महिला पोलीस शिपाई १४२१ तडाखे, पोलीस शिपाई २६४ वाघ आणि पोलीस शिपाई १७२ खंडागळे यांना तात्काळ दौंड कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन येथे झेलम गाडी अटेंड करण्यासाठी रवाना करण्यात आले.
​रवाना झालेल्या टीमने कॉर्ड लाईन रेल्वे स्टेशन येथे पोहोचून झेलम एक्सप्रेस गाडीमध्ये नमूद तीन मुलांचा कसून शोध घेतला. तपासादरम्यान सदर तिन्ही मुले रेल्वे गाडीच्या जनरल बोगीमध्ये मिळून आली. पोलिसांनी तिन्ही मुलांना विश्वासात घेऊन, आपुलकीने विचारपूस करत त्यांच्या नाव-गावाबाबत चौकशी केली. त्यावेळी त्यांनी आपली नावे:
१) फाईक बिन युसुफ २) साहिल अहमद गणी३) आदिल नाझीर बाबा
(सर्व रा. तुल्ला मूल, ता. गांदरबल, जिल्हा गांदरबल, राज्य जम्मू-काश्मीर)
अशी असल्याचे सांगितले.
​दौंड लोहमार्ग पोलिसांनी स्वतः सखीर भवानी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधून तिन्ही मुले सुरक्षित मिळून आल्याबाबतची माहिती कळवली आहे. जम्मू-काश्मीर येथील पोलीस पथक येईपर्यंत सदर तिन्ही अल्पवयीन मुलांची रवानगी कुरकुंभ येथील एका खाजगी संस्थेत करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी राजकुमार शिंदे (माननीय पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे), विशाल गायकवाड (अप्पर पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे), रवींद्र गायकवाड (उपविभागीय पोलीस अधिकारी, लोहमार्ग विभाग पुणे) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी हिमालय गायकवाड (दौंड लोहमार्ग पोलीस स्टेशन), दिवस पाळी ठाणे अंमलदार हवा १३७ जगताप, पोलीस हवालदार ३३४ उमेश कोंगे, पोलीस शिपाई २६४ संजय वाघ, महिला पोलीस शिपाई १४२१ अमृता तडाखे आणि पोलीस शिपाई १७२ सचिन खंडागळे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली आहे. लोहमार्ग पोलिसांच्या या तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!