मुंबईत गणेशमूर्तीचा अपघात; कुर्ल्यात ‘धारावीच्या प्रेमनगरचा महाराजा’ मूर्तीचे नुकसान
मुंबई : कुर्ला पश्चिमेतील शितल तलाव परिसरात ‘धारावीच्या प्रेमनगरचा महाराजा’ या गणेशमूर्तीचा अपघात झाला. विसर्जनासाठी ट्रॉलीमधून मूर्ती नेत असताना स्पीड ब्रेकर ओलांडताना ट्रॉलीचा तोल गेल्याने मूर्तीचे नुकसान झाले.
या दुर्घटनेत दोन जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. मूर्तीचे नुकसान झाल्यानंतर प्रशासनाकडून शितल तलावात मूर्तीचे विसर्जन करण्यात आले.
यापूर्वी भुलेश्वरच्या राजाच्या गणेशमूर्तीला अपघात झाल्याची घटना घडली होती. गणेशमूर्तींची वाहतूक करताना ट्रॉलीची सुरक्षितता आणि विसर्जन मार्गावरील अडथळ्यांकडे प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज या घटनेमुळे समोर आली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 45





