मुंबईतील नगरसेवकांच्या निधीत वाढ; वार्षिक ₹१ कोटी स्वेच्छा निधीला मंजुरी


मुंबईतील नगरसेवकांच्या निधीत वाढ; वार्षिक ₹१ कोटी स्वेच्छा निधीला मंजुरी

मुंबई : मुंबई महापालिकेतील नगरसेवकांच्या स्वेच्छा निधीत तब्बल १२ वर्षांनंतर वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगरसेवकांना मिळणारा वार्षिक ६० लाख रुपयांचा स्वेच्छा निधी आता एक कोटी रुपये करण्याचा प्रस्ताव महापालिका सभागृहाने एकमताने मंजूर केला आहे.
नगरसेविका अश्विनी मते यांनी हा प्रस्ताव सभागृहात मांडला होता. प्रभागातील विविध नागरी आणि विकासकामांना अधिक वेग मिळावा, तसेच स्थानिक पातळीवरील कामांसाठी उपलब्ध निधी वाढावा, हा या निर्णयामागील उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.
मात्र, सभागृहाच्या मंजुरीनंतर या प्रस्तावावर अंतिम निर्णयासाठी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या अभिप्राय अथवा मंजुरीची प्रक्रिया बाकी आहे. आयुक्तांच्या निर्णयानंतर निधीवाढीची अंमलबजावणी होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
निधीत वाढ झाल्यास मुंबईतील प्रभागांमध्ये विकासकामांसाठी नगरसेवकांना अधिक निधी उपलब्ध होणार असून, स्थानिक नागरी समस्यांच्या निवारणाला गती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!