‘सरकारने एकही मागणी मान्य केली नाही’; मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी सरकारने त्यांच्या मागण्या मान्य केल्याचा दावा फेटाळून लावत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या उपोषणाचा आज ११ वा दिवस असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंत्री उदय सामंत यांनी सरकारने जरांगे पाटील यांच्या १२ मागण्या मान्य केल्याचा दावा केला होता. मात्र, सरकारने एकही मागणी मान्य केलेली नाही, असा दावा करत जरांगे पाटील यांनी हा दावा फेटाळून लावला.
दरम्यान, उदय सामंत तसेच भरत गोगावले यांनी केलेल्या टीकेलाही जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले. सरकारने ठोस निर्णय घेतल्याशिवाय उपोषण मागे घेणार नसल्याची भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे.
त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार आणि मनोज जरांगे पाटील यांच्यातील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सरकारच्या दाव्यांवर आणि आंदोलकांच्या भूमिकेवर आता पुढील चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी





