आमदार उमाताई खापरे यांची महिला – स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध राज्यस्तरीय कृती दलाच्या सदस्यपदी निवड


आमदार उमाताई खापरे यांची महिला – स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध राज्यस्तरीय कृती दलाच्या सदस्यपदी निवड

​विशेष प्रतिनिधी (उमेश कुलकर्णी):
आमदार सौ. उमाताई खापरे यांची महाराष्ट्र शासनाच्या महिला – स्त्रीभ्रूण हत्या प्रतिबंध राज्यस्तरीय कृती दलाच्या (State Level Task Force) सदस्यपदी निवड झाली आहे. या निवडीबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
​स्त्रीभ्रूण हत्येला आळा घालणे, महिलांचे संरक्षण तसेच संबंधित कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी करणे या दृष्टीने हे राज्यस्तरीय कृती दल अत्यंत महत्त्वाचे काम करते. उमाताई खापरे यांच्या सामाजिक व राजकीय क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभवाचा फायदा या कृती दलाच्या माध्यमातून राज्यभरात महिलांच्या सुरक्षेसाठी व सबलीकरणासाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
​या महत्त्वपूर्ण निवडीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून आमदार उमाताई खापरे यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


51
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!