सलग दुसऱ्यांदा ‘सांसद रत्न’ पुरस्कार; डॉ. मेधा कुलकर्णींच्या संसदीय कार्याचा गौरव
पुणे : संसदीय कामकाजातील उल्लेखनीय योगदान, जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची धडाडी आणि संसदेत सातत्यपूर्ण सक्रिय सहभागाची पुन्हा एकदा दखल घेण्यात आली आहे. डॉ. मेधा कुलकर्णी यांना सलग दुसऱ्यांदा प्रतिष्ठित ‘सांसद रत्न पुरस्कार’ प्रदान करून त्यांच्या संसदीय कार्याचा गौरव करण्यात आला.
संसदेत विविध महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने आवाज उठवत जनतेच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ मिळवून देण्याच्या त्यांच्या कार्याची या पुरस्काराच्या माध्यमातून विशेष दखल घेण्यात आली आहे. अभ्यासपूर्ण मांडणी, जनहिताच्या विषयांवरील सक्रिय सहभाग आणि संसदीय जबाबदारीप्रती असलेली बांधिलकी यामुळे डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या कार्याची वेगळी छाप निर्माण केली आहे.
सलग दुसऱ्यांदा ‘सांसद रत्न’ पुरस्कार मिळणे ही त्यांच्या संसदीय कारकिर्दीतील महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद कामगिरी मानली जात आहे. या सन्मानामुळे त्यांच्या कार्याला आणखी बळ मिळाले असून, आगामी काळातही जनहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडत राष्ट्रहितासाठी योगदान देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन होत असून, त्यांच्या पुढील संसदीय वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी 9822548429






