🚨 पिंपरी-चिंचवडमध्ये गुन्हे शाखा युनिट-३ ची धडक कारवाई
वाहनचोरीचे ३ गुन्हे उघड; १ लाख ७५ हजारांचा मुद्देमाल जप्त.

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट-३ ने वाहनचोरीच्या गुन्ह्यांवर कारवाई करत एका २० वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून सुमारे १ लाख ७५ हजार रुपये किमतीच्या तीन चोरीच्या मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या असून, वाहनचोरीचे तीन गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
जॉर्डन राजेश साळवे (वय २०, रा. घरकुल, चिखली) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे घरकुल परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.
पोलीस तपासादरम्यान आरोपीने चिखली, रुपीनगर आणि दापोडी परिसरातून वाहने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. या कारवाईमुळे चिखली आणि दापोडी पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे व गुन्हे शाखा युनिट-३ च्या पथकाने केली.
🔴 वाहनचोरांविरोधात गुन्हे शाखेची कारवाई सुरू असून, नागरिकांनी आपली वाहने सुरक्षित ठिकाणी उभी करून आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे







