मत माऊली यात्रा जाणाऱ्या भाविकांना संविधान ग्रुपच्या वतीला खिचडी वाटप

टाकळीभान: – प्रतिनिधी – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील सविधान ग्रुपच्या वतीने हरेगाव मतमाऊली यात्रेनिमित्त येणाऱ्या भाविकांना टाकळीभान स्टॅन्ड परिसर येथे खिचडी फराळ, केळी व चहापाणी खिचडीचे वाटप माजी सभापती नानासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व संविधान ग्रुपच्या सदस्यांच्या वतीने करण्यात आले
याप्रसंगी सविधान ग्रुपचे मेजर विनोद रणनवरे, आप्पासाहेब रणनवरे, शामराव खरात मामा, अनिताताई तडके रिपाईचे जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब रणनवरे,शंकर रणनवरे, किशोर मामा रणपिसे, पप्पू रणनवरे पंकज जाधव, प्रतीक रणनवरे रवींद्र रणनवरे, सागर रणनवरे प्रकाश रणनवरे आनंदा रणनवरे, पंकज अमोलिक, रवींद्र गाढे, सौरभ रणनवरे, गौरव चितळे, विजय कनगरे, प्रणव अमोलिक, बाळासाहेब बोडखे, आदीसह संविधान ग्रुपचे सर्व सदस्य व ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून सहकार्य केले. गेल्या पाच वर्षापासून सविधान ग्रुपची ही अविरत सेवा सुरू असून , भाविकांनी संविधान ग्रुपचे आभार व्यक्त केले.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर







