बाळासाहेब दुधाळे यांची शिवसेना ओ.बी.सी. बारा बलुतेदार विभागाच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी निवड..


बाळासाहेब दुधाळे यांची शिवसेना ओ.बी.सी. बारा बलुतेदार विभागाच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी निवड

टाकळीभान प्रतिनिधी-: शिवसेना प्रणित ओ.बी.सी. बारा बलुतेदार विभागाच्या श्रीरामपूर तालुकाध्यक्षपदी बाळासाहेब घेवरचंद दुधाडे (रा. टाकळी भान, ता. श्रीरामपूर, जि. अहिल्यानगर) यांची अधिकृत निवड करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि ओ.बी.सी. बारा बलुतेदार विभागाचे प्रदेशाध्यक्ष अॅड. डॉ. पी. बी. कुंभार यांच्या स्वाक्षरीने हे नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्तीचा कालावधी एक वर्षाचा असणार आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीनुसार पक्षाचा प्रचार व प्रसार श्रीरामपूर तालुक्यात प्रभावीपणे केला जाईल, असा विश्वास पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे. बाळासाहेब दुधाडे यांच्या या निवडीबद्दल श्रीरामपूर तालुक्यातील शिवसैनिकांनी व नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या पुढील राजकीय व सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!