गणरायाच्या चरणी विकासाची प्रार्थना! कॅप्टन आशिष दामले यांच्या हस्ते पुण्यात मानाच्या गणपतींची महाआरती
पुणे, दि. १५ सप्टेंबर : पुण्यातील मानाच्या गणपती मंडळांच्या दर्शनासाठी आलेले परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री कॅप्टन आशिष जी. दामले यांच्या हस्ते मंगळवारी मानाच्या गणपतींची विधिवत महाआरती करण्यात आली.
यावेळी अखिल भारतीय पेशवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन वाडे पाटील तसेच राष्ट्रवादी उद्योग आघाडी पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष चैतन्य जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती. महाआरतीनंतर विविध गणपती मंडळांच्या वतीने मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.यावेळी अनेक मान्यवर आणि नगरसेवक उपस्थित होते..
यावेळी कॅप्टन आशिष दामले यांनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करताना, परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ब्राह्मण समाजातील जास्तीत जास्त व्यावसायिकांना आर्थिक व व्यवसायविषयक मदत मिळावी आणि त्यांच्या उद्योग-व्यवसायाची भरभराट व्हावी, अशी भावना व्यक्त केली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429







