गौण खनिज क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे लोकार्पण


गौण खनिज क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा; ‘महाखनिज 2.0’ प्रणालीचे लोकार्पण

मुंबई : गौण खनिज क्षेत्रातील व्यवस्थापन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम करण्याच्या उद्देशाने महसूल विभागाच्या ‘महाखनिज 2.0’ प्रणाली व मोबाईल ॲपचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मंत्रालय, मुंबई येथे करण्यात आले. यावेळी राज्य महाखनिज नियंत्रण कक्षाचेही उद्घाटन करण्यात आले.
‘महाखनिज 2.0’ प्रणालीच्या माध्यमातून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गौण खनिज क्षेत्रातील विविध प्रक्रियांवर अधिक प्रभावी देखरेख ठेवता येणार आहे. विविध शासकीय प्रणालींचे एकत्रीकरण करण्यात आल्याने खनिज क्षेत्राचे सर्वेक्षण, खनिज वाहतुकीवर नियंत्रण तसेच परवान्यांची डिजिटल पडताळणी अधिक सुलभ आणि प्रभावी होणार आहे.
या प्रणालीमुळे खनिज क्षेत्रातील अनियमितता वेळीच ओळखणे, महसुलातील तफावत व गळती कमी करणे आणि शासनाच्या महसुलाचे संरक्षण व वाढ करणे शक्य होणार आहे. त्यामुळे गौण खनिज व्यवस्थापनात डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होऊन प्रशासन अधिक पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रिमंडळातील अन्य सदस्य, वरिष्ठ अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!