पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आशीर्वादाचा दिवा’ रेकॉर्ड ब्रेक उपक्रम
१७ सप्टेंबरला २ लाखांहून अधिक नागरिकांचा सहभाग; ‘सेवा संकल्प अभियान’ महिनाभर
पिंपरी-चिंचवड : देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, पिंपरी-चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण महिनाभर ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत १७ सप्टेंबर रोजी शहरातील २ लाखांहून अधिक नागरिक हातात दिवा घेऊन पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना शुभेच्छा व आशीर्वाद देणार असून, हा उपक्रम रेकॉर्ड ब्रेक करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात आला आहे.
या महिनाभराच्या **‘सेवा संकल्प अभियान’**मध्ये ‘आशीर्वादाचा दिवा’, रोजगार मेळावे, रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, ‘स्वप्नाचा भारत’, चित्रकला, भाषण, ‘नमो सेवा गाथा’, अंगणवाडी सेविका सन्मान, विकास कामांची रील स्पर्धा, ‘सेवादीप यात्रा’, ‘सेवा व आपले योगदान’, ‘सेवा सेतू अभियान’, रांगोळी स्पर्धा, ‘विकसित भारत संकल्प यात्रा’, ‘इनोव्हेशन चॅलेंज’ आणि ‘जनसेवेचा महाकुंभ’ यांसारखे विविध समाजोपयोगी व सेवाभावी उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविले जाणार आहेत.
भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा महामंत्री मधुकर बच्चे हे ‘आशीर्वादाचा दिवा’ या अभियानाचे शहर संयोजक आहेत. या अभियानाच्या यशस्वितेसाठी शहर प्रभारी भरत नाना पाटील, भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे, आमदार शंकर भाऊ जगताप, महेश दादा लांडगे, उमाताई खापरे, अमितजी गोरखे, मा. आमदार अश्विनीताई जगताप, सेवा संकल्प अभियानाचे प्रमुख व महामंत्री मोरेश्वर शेडगे, महामंत्री मधुकर बच्चे, विकास डोळस, वैशाली खाडेय, महिला अध्यक्ष सुजाता पालांडे, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश यादव, वरिष्ठ उपाध्यक्ष संजय पटणी यांच्यासह शहरातील विविध आघाड्या, मोर्चे, प्रकोष्ट तसेच सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेणार आहेत.
उपक्रमाचे नियोजनबद्ध आणि प्रभावी आयोजन करण्यासाठी विधानसभा निहाय समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
चिंचवड विधानसभा : जोशना कलाटे, भरत ठाकूर, स्वाती जाधव
भोसरी विधानसभा : गीता महेंदू, गायत्री तळेकर, चित्रा अभंग
पिंपरी विधानसभा : महेंद्र बाविस्कर, अनघा रुद्र, राखी अर्जुन
यासोबतच शहरातील सर्व मंडल अध्यक्ष गणेश ढोरे, हर्षद नढे, सनी बारणे, सोमनाथ तापकीर, मोहन राऊत, शिवराज लांडगे, प्रमोद परदेशी, अजय साने, रामदास कुटे, अजित बुर्डे, अनिता वाळुंजकर, जयदीप खापरे, मंगेश धाडगे, धरम वाघमारे आदी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या मोहिमेत सक्रिय सहभाग घेणार आहेत.
१७ सप्टेंबर रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी आपल्या हातात दिवा घेऊन मा. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना शुभेच्छापर आशीर्वाद द्यावेत, असे विनम्र आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
9822548426






