चक्रतीर्थ महादेव मंदिर येथे भूमिपूजन व महामंडलेश्वर पट्टाभिषेक सोहळा उत्साहात


चक्रतीर्थ महादेव मंदिर येथे भूमिपूजन व महामंडलेश्वर पट्टाभिषेक सोहळा उत्साहात

आन्वा: प्रतिनिधी /महेंद्र बेराड- भोकरदन तालुक्यातील मौजे आन्वा येथील चक्रतीर्थ महादेव मंदिर परिसरातील कुटिया तसेच अकरा फुटी ध्यानस्थ महादेव मूर्तीच्या परिसरातील विकासकामांचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. याच मंगलप्रसंगी श्री महंत हनुमानगिरी महाराज यांचा महामंडलेश्वर पट्टाभिषेक सोहळाही मोठ्या उत्साहात पार पडला.

या धार्मिक सोहळ्यास श्री श्री १००८ महामंडलेश्वर डॉ. विशालानंद सरस्वतीजी महाराज, भागवताचार्य तथा महामंत्री, जगदंबा शक्तीपीठ आखाडा, संभाजीनगर, तसेच श्री श्री महामंडलेश्वर धर्मगुरू डॉ. प्रदीप चैतन्य फाले महाराज, प्रमुख तथा अध्यक्ष, यांच्यासह श्री महंत शालिक गिरी महाराज, महंत शिवगिरी महाराज, खुशालराव महाराज, गणेश महाराज आदी साधुसंत व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी सत्य संकल्प युनिव्हर्सल ग्लोबल फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वरजी सुसर तसेच Special Associate & Social Coordinator श्री. सुनील रामचंद्र उंबरकर यांनी उपस्थित राहून या धार्मिक कार्यास सहकार्य केले.

सत्य संकल्प युनिव्हर्सल ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने धार्मिक, सामाजिक आणि समाजोपयोगी कार्यांना सातत्याने सहकार्य करण्याचा मानस यावेळी व्यक्त करण्यात आला. धार्मिक कार्यातून समाजामध्ये संस्कार, एकता आणि सकारात्मक विचारांची जपणूक होते. अशा पवित्र कार्यांना हातभार लावत फाउंडेशनच्या माध्यमातून अखंड भारतभर सामाजिक व धार्मिक उपक्रम सुरू ठेवण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

गावकरी, साधुसंत, अतिथी, मान्यवर आणि भक्तगण यांच्या उपस्थितीत महामंडलेश्वर पट्टाभिषेक सोहळा भक्तिमय व आनंददायी वातावरणात पार पडला. चक्रतीर्थ महादेव मंदिर परिसरातील विकासकामांना सुरुवात झाल्याने भाविकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

धर्म, सेवा आणि समाजहिताचा संकल्प घेऊन सुरू झालेल्या या पवित्र कार्याला सर्वांचे आशीर्वाद व सहकार्य लाभावे, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.


52
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!