SET परीक्षा तिसऱ्यांदा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला होणार


SET परीक्षा तिसऱ्यांदा लांबणीवर; आता २५ ऑक्टोबरला होणार
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे सहायक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी ४१ वी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (SET) पुन्हा एकदा लांबणीवर टाकण्यात आली आहे. ही परीक्षा आता २५ ऑक्टोबर २०२६ रोजी घेण्यात येणार आहे.
यापूर्वी नियोजित वेळापत्रकानुसार SET परीक्षा २६ जुलै रोजी होणार होती. मात्र विविध कारणांमुळे परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला. आता ही परीक्षा तिसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे.
UPSC परीक्षा, अनंत चतुर्दशी तसेच परीक्षार्थींच्या प्रवासातील संभाव्य अडचणींचा विचार करून परीक्षेची तारीख बदलण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, परीक्षेचे वेळापत्रक वारंवार बदलण्यात येत असल्याने परीक्षार्थींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अभ्यासाचे नियोजन, प्रवास आणि इतर तयारीवर या बदलांचा परिणाम होत असल्याचे परीक्षार्थींचे म्हणणे आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


53
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!