महाराष्ट्रात ८१०० पदांची पोलीस मेगाभरती? डिसेंबरमध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची माहिती; अधिकृत जाहिरातीची प्रतीक्षा


महाराष्ट्रात ८१०० पदांची पोलीस मेगाभरती?
डिसेंबरमध्ये ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची माहिती; अधिकृत जाहिरातीची प्रतीक्षा
मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्यात सुमारे ८,१०० रिक्त पदांसाठी पोलीस मेगाभरती होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, भरतीची पदसंख्या, अर्जाच्या तारखा आणि इतर तपशीलांची अधिकृत अधिसूचनेद्वारे अंतिम पुष्टी होणे अद्याप बाकी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गृह विभागाने जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पदांची माहिती मागवली असून त्यानुसार भरतीचा आराखडा तयार केला जात असल्याचे सांगण्यात येत आहे.
प्रस्तावित वेळापत्रकानुसार, १ ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज प्रक्रिया राबवली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर १ जानेवारी २०२७ पासून प्रत्यक्ष भरती प्रक्रियेला सुरुवात होऊ शकते.
या प्रस्तावित भरतीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११७ पदांचा समावेश असल्याची माहितीही समोर आली आहे.
दरम्यान, उमेदवारांनी भरतीबाबत सोशल मीडिया किंवा अनधिकृत माध्यमांवरील माहितीवर अवलंबून राहण्याऐवजी महाराष्ट्र पोलीस आणि संबंधित शासकीय विभागाकडून प्रसिद्ध होणाऱ्या अधिकृत जाहिरातीची प्रतीक्षा करावी. पदनिहाय संख्या, आरक्षण, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि परीक्षेचे वेळापत्रक याबाबत अंतिम माहिती अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतरच स्पष्ट होईल.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


53
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!