मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; सरकारला ९० दिवसांची मुदत


मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित; सरकारला ९० दिवसांची मुदत

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारकडून मिळालेल्या आश्वासनांनंतर आपले उपोषण स्थगित केले आहे. मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांनी राज्य सरकारला ९० दिवसांची मुदत दिली आहे.
हैदराबाद गॅझेटमध्ये आवश्यक सुधारणा करून त्यानुसार शासन निर्णय (GR) काढण्याची तयारी सरकारने दर्शविल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले. तसेच शिंदे समितीने शोधलेल्या ५८ लाख मराठा-कुणबी नोंदींपैकी एकही नोंद कमी केली जाणार नाही, अशी सरकारकडून ग्वाही मिळाल्याचा दावा त्यांनी केला.
सध्या समाजाच्या हितासाठी उपोषण स्थगित करत असलो तरी मराठा आरक्षणाचा लढा थांबलेला नाही, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. सरकारने दिलेल्या मुदतीत मागण्या पूर्ण न झाल्यास पुढील भूमिका ठरवली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


53
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!