मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा


मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनी बीड-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा

बीड, दि. १७ सप्टेंबर : मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाचे औचित्य साधून बीड-पुणे रेल्वेसेवेचा शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून या सेवेचे उद्घाटन करण्यात आले.
या रेल्वेसेवेमुळे बीड जिल्ह्यातील नागरिकांचा पुणे, मुंबई तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध भागांशी प्रवास अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रवासी वाहतुकीसोबतच बीडमधील स्थानिक व्यापार आणि आर्थिक व्यवहारांना चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी बीडकरांना दिलेला शब्द पूर्ण झाल्याचे सांगितले. बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असून भविष्यातही विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


53
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!