ढोल-ताशांचा विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण; नाकाचे हाड फ्रॅक्चर


ढोल-ताशांचा विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण; नाकाचे हाड फ्रॅक्चर

ढोल-ताशांचा विरोध करणाऱ्या तरुणाला मारहाण; नाकाचे हाड फ्रॅक्चर
मुंबई : गोरेगाव पूर्व परिसरात रात्री १० नंतर सुरू असलेल्या ढोल-ताशांच्या आवाजाला विरोध करत त्याचे फोटो काढणाऱ्या अद्वैत मडकईकर या तरुणाला मारहाण केल्याची घटना १५ सप्टेंबरच्या रात्री घडली. या मारहाणीत अद्वैतच्या नाकाचे हाड तुटल्याची माहिती आहे.
या प्रकरणात शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ता आणि किक बॉक्सर दिलीप शर्मा व त्याच्या साथीदारांनी अद्वैतला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. अद्वैत हा प्रख्यात रंगकर्मी अरुण मडकईकर यांचा मुलगा असल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली असून, पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


53
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!