शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात


शेगावच्या श्री गजानन महाराज संस्थानचा दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात

शेगाव : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचा हात देत शेगाव येथील श्री गजानन महाराज संस्थानने सामाजिक बांधिलकी जपत १ कोटी ११ लाख रुपयांचा मदतनिधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला.
राज्यात अल निनोच्या प्रभावामुळे तसेच सरासरीपेक्षा कमी पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी संस्थानने पुढाकार घेतला.
संस्थानतर्फे १ कोटी ११ लाख रुपयांचा धनादेश तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी सुपूर्द करण्यात आला. या मदतीमुळे संकटग्रस्त शेतकऱ्यांना आधार मिळावा, हा संस्थानचा सामाजिक हेतू होता.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!