सेवा संकल्प अभियानांतर्गत निगडीमध्ये भव्य चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा संपन्न; ३५० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*


*सेवा संकल्प अभियानांतर्गत निगडीमध्ये भव्य चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा संपन्न; ३५० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग*

पिंपरी चिंचवड:
देशाचे माननीय पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबवल्या जाणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत, भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडी (पिंपरी चिंचवड शहर) च्या वतीने भव्य चित्रकला व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यमुनानगर, निगडी येथील एस.पी.एम. मराठी माध्यम शाळेत पार पडलेल्या या उपक्रमास शालेय विद्यार्थ्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला असून ३५० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांच्या मनात राष्ट्रभक्ती व राष्ट्रनिर्मितीची भावना दृढ करण्यासाठी ‘विकसित भारत’ आणि ‘माझ्या स्वप्नातील भारत’ या विषयांवर ही स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेतून रेखाटलेली चित्रे आणि प्रभावी भाषणांमधून मांडलेले विचार उपस्थितांची मने जिंकून घेणारे ठरले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन भाजप युवा मोर्चा उद्योग आघाडीचे शहराध्यक्ष आदित्य कुलकर्णी व उपाध्यक्ष दिपराज गुप्ता यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते.

या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव अजित कुलथे, भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दिनेशजी यादव , नगरसेवक उत्तम केंदळे, नगरसेवक बापू घोलप , भाजप पिंपरी चिंचवडचे जिल्हा सचिव गिरीश देशमुख, युवा मोर्चा मंडल अध्यक्ष ऋषिकेश भालेकर, महिला मोर्चा मंडल अध्यक्षा किरण पाचपांडे, महिला मोर्चा मंडल सरचिटणीस मनीषा कुलकर्णी, मंडल उपाध्यक्ष वसुंधरा देशपांडे तसेच महिला मोर्चा जिल्हा सदस्य जयश्री मकवाना आदी मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांच्या कलागुणांचे व विचारांचे भरभरून कौतुक केले, तसेच देशाच्या भावी पिढीमध्ये ‘विकसित भारत’ घडवण्याची मोठी क्षमता असल्याचे मत व्यक्त केले. स्पर्धेच्या शेवटी सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल शाळा व्यवस्थापन, शिक्षक वर्ग आणि पालकांनी आयोजकांचे मनःपूर्वक आभार मानले.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!