भारतीय जनता पक्षात बंडखोरी होणार का तिकीट बदलले जाणार….
आगामी होऊ घातलेल्या पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष कोणाला तिकीट देणार याची उत्सुकता शिखला पोचली आहे या मतदारसंघांमध्ये सध्याचे विद्यमान आमदार पुत्र यांनी भारतीय जनता पक्षात तिकीट मिळेल या आसेने प्रवेश केलेला असला तरीसुद्धा मागील दीड वर्षापासून सतत पदवीधर नोंदणी करून अखंडपणे पदवीधरांच्या कामांमध्ये असलेला 1990 पासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मोशीत तयार झालेला व 1996 पासून भारतीय जनता पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता असलेला डॉक्टर मिलिंद संपगावकर हा तरुण लक्ष वेधून घेत आहे,
अर्थशास्त्रातील पीएचडी यशस्वी उद्योजक संघ व वरिष्ठांशी असलेले संबंध या त्यांच्या महत्त्वाच्या बाजू असल्या तरी त्यांनी तब्बल 78 हजार मतदारांची नोंदणी केलेला दावा केला असून त्यांच्या या नोंदणी त्यांच्या वेबसाईटच्या मार्फत मागील वर्षभरापासून सुरू आहे त्यांची एक संपूर्ण टीम मागच्या वर्षभरापासून संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहे त्यामुळे त्यांना तिकीट मिळाले तर भारतीय जनता पक्षाला ही निवडणूक सोपी जाईल यात तिळमात्र शंका नाही मात्र एवढी तयारी केल्यानंतर ही व्यक्ती जर टिकीट मिळाली नाही तर थांबणार का बंडखोरी करणार यावर पुणे शहर परिसरात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेले आहे
या मागचे कारण डॉक्टर मिलिंद संपगावकर यांनी नोंदणीसाठी जे पत्रक बनवले होते त्या नोंदणीच्या पत्रकामध्ये त्यांनी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की पुणे लोकसभेचे तिकीट मागितले होते ते न मिळाल्याने बंडखोरी त्यावेळेस केली नाही व त्यानंतर झालेल्या विधानसभा व महानगरपालिका या दोन्ही निवडणुकीमध्ये तिकिटाची मागणी देखील केली नाही मी आता डायरेक्ट पुणे पदवीधर मतदारसंघाच्या तिकिटाची मागणी पक्षाकडे केली असून मला कोणाचे नेतृत्व करावे याचा मी सारासार विचार केलेला आहे आणि पुणे पदवीधर मतदार संघामध्ये आगामी होऊ घातलेल्या निवडणुकीत मी उमेदवार म्हणून असणार आहे असा संदेश मागील काही दिवसापासून त्यांचे कार्यकर्ते समाज माध्यमांमध्ये फिरवत आहेत.
सध्याची राजकीय परिस्थिती बघता पुणे पदवीधर मतदारसंघासाठी उच्चशिक्षित उमेदवार असावा व ज्याला राजकारणाचे घराणेशाहीचे कुठलेही पाठबळ नसावे असा एक सूर पदवीधर युवकांमध्ये ऐकायला येत असून अशा वेळेस डॉक्टर संपगावकर यांचं नाव पुढे येणे हे डॉक्टर संपगावकर यांना फायदेशीर ठरू शकते त्यांची नामांकित उद्योजक म्हणून असलेली प्रतिमा विमा सारख्या क्षेत्रांमध्ये केलेला विश्वविक्रम 500 पेक्षा अधिक पुरस्कार अर्थशास्त्रातील पीएचडी विमा क्षेत्रातील मानद डिलीट हे त्यांच्या यशस्वी असण्यामागचे पुरावे आपण म्हणू शकतो असा सर्वसामान्यांना नेहमी संपर्कात असणारा व कधीही संपर्क होऊ शकणारा असा उमेदवार डॉक्टर संपगावकर ठरू शकतात अशी भावना अनेक पदवीधर मतदारांमध्ये आहे त्याचबरोबर सीनियर सिटीजन असलेल्या अनेक संघाच्या पक्षाच्या जुन्या जाणत्या स्वयंसेवक व कार्यकर्त्यांनी डॉक्टर संपगावकर यांचा झेंडा व नाव उचलून धरले आहे
यावरून आगामी पुणे पदवीधर निवडणूक ही अधिक चुरशीची होणार व भारतीय जनता पक्षाला डॉक्टर संपगावकर यांच्या उमेदवारीचा फटका बसणार का फायदा होणार हे आगामी काळच ठरवेल
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429








