अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा यांना महर्षि पुरस्कार


अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा यांना महर्षि पुरस्कार

नाशिक-त्र्यंबकेश्वर : महर्षि पंचायतन सिद्धपीठम यांच्या वतीने नाशिक-त्र्यंबकेश्वर, महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘ज्ञान कुंभ-२०२६’ या कार्यक्रमात अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा यांना ‘महर्षि पुरस्कार-२०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
धार्मिक, आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची दखल घेत डॉ. शर्मा यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला संत, महंत, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!