डॉ. मुन्ना कुमार शर्मा ‘नॅशनल फेडरेशन फॉर हिंदू राष्ट्र’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी
नोएडा : एनएसईझेड, फेज-२, नोएडा येथे ‘नॅशनल फेडरेशन फॉर हिंदू राष्ट्र’च्या सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मुन्ना कुमार शर्मा यांची सर्वानुमते ‘नॅशनल फेडरेशन फॉर हिंदू राष्ट्र’च्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
भारताला संवैधानिकदृष्ट्या हिंदू राष्ट्र बनविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या सामाजिक व सांस्कृतिक संघटनांचा समूह म्हणून या फेडरेशनची ओळख असल्याचे कार्यालयाकडून सांगण्यात आले.
बैठकीत फेडरेशनच्या आगामी कार्याबाबत तसेच संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 34








