कामावरून काढल्याच्या रागातून गॅरेजला आग; २० दुचाकी जळून खाक, माजी कर्मचाऱ्यावर संशय


कामावरून काढल्याच्या रागातून गॅरेजला आग; २० दुचाकी जळून खाक, माजी कर्मचाऱ्यावर संशय

नागपूर : कामावरून काढल्याच्या रागातून माजी कर्मचाऱ्याने गॅरेजला आग लावल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबा दीपनगर परिसरात ही घटना घडली.
या आगीत ‘दिवेश होंडा सर्व्हिस’ गॅरेजमधील तब्बल २० दुचाकी जळून खाक झाल्या. प्राथमिक माहितीनुसार, गॅरेजचे सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीची झळ शेजारील क्लिनिकलाही बसली असून तेथे अंदाजे २ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत आग आटोक्यात आणली. दरम्यान, कपिलनगर पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून संशयित माजी कर्मचाऱ्याचा शोध घेत आहेत.
पत्रकार : उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!