महाराष्ट्रात आता ॲपवरून रुग्णवाहिका बुक करता येणार? परिवहन विभागाचा महत्त्वाचा प्रस्ताव


महाराष्ट्रात आता ॲपवरून रुग्णवाहिका बुक करता येणार? परिवहन विभागाचा महत्त्वाचा प्रस्ताव

मुंबई : वैद्यकीय आणीबाणीच्या काळात रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी महाराष्ट्र परिवहन विभागाकडून रुग्णवाहिका बुकिंगसाठी डिजिटल प्रणाली विकसित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. ओला-उबरप्रमाणे मोबाइल ॲप आणि संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची संकल्पना आहे.

या प्रस्तावानुसार आरोग्य विभागाच्या सहकार्याने सरकारी तसेच खासगी रुग्णवाहिका डिजिटल प्रणालीशी जोडण्याचा विचार आहे. ॲपद्वारे उपलब्ध रुग्णवाहिकेचे लोकेशन, घटनास्थळी पोहोचण्याचा अंदाजे वेळ आणि सेवा शुल्क याची माहिती नागरिकांना मिळू शकणार आहे.

रस्ते अपघात, गंभीर आजार किंवा अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका शोधण्यासाठी लागणारा वेळ कमी करणे हा या प्रस्तावामागील प्रमुख उद्देश आहे. प्रणाली कार्यान्वित झाल्यास रुग्णवाहिका सेवेतील समन्वय अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.

पत्रकार : उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!