शेतकऱ्यांसाठी संघर्ष करुन व्यवस्थेचा करेक्ट कार्यक्रम केला – अॅड. काळे टाकळीभान येथे आकारी पडीत शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार..


शेतकऱ्यांसाठी संघर्ष करुन व्यवस्थेचा करेक्ट कार्यक्रम केला – अॅड. काळे टाकळीभान येथे आकारी पडीत शेतकऱ्यांच्यावतीने सत्कार

टाकळीभान प्रतिनिधी :-सरकार शेतकऱ्यांठी विविध योजना जाहीर करुन शेतकऱ्यांप्रती फसवा कळवळा दाखवत असेल तरी संपूर्ण व्यवस्था सडकी झाली असल्यामुळे संघर्ष करावा लागतो.सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे. व्यवस्था बदलायची असेल तर संघर्ष करावाच लागणार. आकारी पडीत शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळण्यासाठी अधिकाऱ्यांनी अडथळे निर्माण केले. मात्र हक्काच्या जमिनीसाठी संघर्ष करुन करेक्ट कार्यक्रम केला असल्याचे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांनी केले.

टाकळीभान येथे ग्रामसचिवालयाच्या खा. गोविंदराव आदिक सभागृहात आकारी पडीत शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रगतशिल शेतकरी रामभाऊ नाईक होते. आकारी पडीत शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी १०६ वर्षानंतर परत मिळवून देण्यासाठी संभाजीनगर खंडपीठात संघर्ष करणारे अॅड. अजित काळे यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शेतकरी संघटनेचे नेते साहेबराव चोरमळ, शरद आसने, सोपानराव नाईक, बंडोपंत चौगुले, डॉ. रोहीत कुलकर्णी, वसंतराव शेरकर, प्रभाकर कांबळे, खंडेराव सरोदे,दिलीपराव पवार यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ९ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांनी अॅड. काळे यांचा सत्कार केला. या सत्काराला उत्तर देताना अॅड. काळे यांनी व्यवस्थेवर चांगलेच आसुड ओढले.

पुढे बोलतना अॅड. काळे म्हणाले. सरकारी व्यवस्था पूर्णपणे खिळखिळी झाली आहे. सरकार शेतकऱ्यांसाठी योजना सुरु करुन शेतकऱ्यांप्रती कळवळा दाखवत असल तरी सरकारचे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. संघर्ष केल्याशिवाय काहीही मिळत नाही. आकारी पडीत

शेतकऱ्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांनी अनेक अडथळे निर्माण केले. मात्र न्यायालयात योग्य सादरीकरण केल्याने न्यायालयाने जमिनी परत देण्याचा निर्णय दिला. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शासनपातळीवर सहकार्य केल्याने सरकारला जमिनी परत देण्याचा निर्णय घ्यावा लागला. दुर्दैवाने न्यायासाठी व्यवस्थेशी नेहमी संघर्षाची भूमिका घ्यावी लागते. शेतकऱ्यांसाठी संघर्षाची भूमिका यापुढील काळातही सुरुच राहील. या संघर्षातून करेक्ट कार्यक्रम आपण करतो.

अशोक कारखाना कामधेनू आहे. अशोकला वैचारीक विरोध आहे. कामधेनू जगली पाहीजे. कारखाना बंद पडला तर तालुक्याची बाजारपेठ उध्वस्त होईल व पुढील अनेक वर्षे दुष्परीणाम भोगावे लागतील. त्यामुळे शेतकरी संघटना ऊसतोडीला आडवी येवून विरोध करणार नाही. मात्र शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर दिल्याशिवाय तयार झालेली साखर बाजारात येवू दिली जाणार नाही. असा इशाराही अशोकच्या व्यवस्थापनाला अॅड. काळे यांनी देवून दुष्काळाच्या पाश्वभूमीवर ई-पिकपाहणीच्या नोंदी झालेल्या असतानाही बांधावर जावून पिकाच्या पंचनाम्याचा फार्स कशासाठी असा सवालही त्यांनी उपस्थित केला.असेही अॅड. काळे यावेळी म्हणाले.

यावेळी एशियन गेम कबड्डी मध्ये दोन सुवर्ण पदक विजेता टाकळीभान भूमिपुत्र असलम इनामदार यांचा सत्कार एडवोकेट अजित दादा काळे यांच्या हस्ते करण्यात आला,

याप्रसंगी विष्णुपंत खंडागळे,राजेंद्र कोकणे, साहेबराव चोरमळ, अनिल बोडखे आदींनी मनोगत व्यक्त केले ,

यावेळी लहानभाऊ नाईक, सचिन वेताळ, डॉ. नवले, डॉ. आदिक, सतिश नाईक , बंडोपंत बोडखे, गजानन कोकणे, मधुकर गायकवाड, जिल्हा उद्योग आघाडीचे अध्यक्ष अनिल बोडखे, रणजित बोडखे, कृष्णा वेताळ, सुजित बोडखे,विश्व धावपटू भाऊसाहेब गव्हाणे, प्रल्हाद कापसे, प्रा. दिलीप कोकणे, प्रकाश वेताळ, देविदास नाईक, नितीन वेताळ, बंडू वेताळ, कृष्णा वेताळ, बबन नाईक, अशोक नाईक, सुनिल नाईक, अनिल नाईक, बाळासाहेब वेताळ, ज्ञानेश्वर कोकणे, सुनिल पटारे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.तर आभार प्राचार्य जयकर मगर यांनी मानले.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!