अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याअवैध वाळु वाहतुक करणारा १ जेसेबी व १ डंपर पकडला २ इसमांवर मोठी कारवाई करुन २०,३०,०००/- रु.किं. चे मुददेमाल जप्त

टाकळीभान प्रतिनिधी-पथकाचे कोपरगाव तालुका पो.स्टे. हददीत अवैध वाळु वाहतुक करणारा १ जेसेबी व १ डंपर पकडला २ इसमांवर कारवाई करुन २०,३०,०००/- रु.किं. चे मुददेमाल जप्त अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयाची अवैध वाळु वाहतुकीवर मोठी कारवाई
सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर यांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीमध्ये अवैध धंदयांची माहिती काढुन कायदेशीर कारवाई करणेकरीता पोहेकॉ सचिन सिताराम धनाड, पोहेकों/ अनिल काशीनाथ शेंगाळे, पोकों/अक्षय प्रकाशराव भोसले सर्व नेमणुक अपर पोलीस अधीक्षक, कार्यालय श्रीरामपुर यांना आदेशीत केले होते.
वरील आदेशान्वये दि.०३/१०/२०२६ रोजी ११.०० वा. चे सुमरास सदर पथक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीत पेट्रालिंग करत असतांना पथकास गोपनिय माहिती मिळाली की, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हददीत मायगाव देवी गावचे शिवारात, मायगाव देवी मंदिराकडे जाणारे रोडने काही इसम जेसेबी व टिप्पर (डंपर) चे साहयाने अवैध वाळु वाहतुक करत आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने वरीष्ठांना कळुवन तात्काळ बातमीतील ठिकाणी जाणेकरीता कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन येथील माहितीगार पोलीस अंमलदार पोकों युवराज खुळे यांना बोलावुन त्यांना तसेच त्यांनी बोलावीलेल पचांना बातमीतील हकीगत समजावुन सांगुन पंचासह नमुद पथक बातमीतील ठिकाणी रवाना झाले.
नमुद पथक दि.०३/१०/२०२६ रोजी १५.३० वा. चे सुमारास मायगाव देवी गावचे शिवारात, मायगाव देवी मंदिराकडे जाणारे रोडने पेट्रोलिंग करता असतांना रोडचे बाजुला एका मोकळया जागेत वाळुचा साठा दिसला तसेच त्या ठिकाणी एक जेसेबी मशीनच्या साहयाने एक डंपर वाळु भरत असतांना दिसला बातमीतील हकीगती प्रमाणे खात्री होताच तात्काळ स्टाफ व पंचासह सदर ठिकाणी छापा टाकुन जेसीबी व टिप्पर (डंपर) चालकास जागीच पकडले त्यांना पोलीस व पंचाची ओळख सांगुन त्यातील जेसेबी नं. एम.एच १७ डी.जे. ४५८० वरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १) किशोर देवीदास धोत्रे, वय २६ वर्ष, रा.मायगावा देवी, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले तसेच डंपर क्रमांक एम.एच.१२ एस एक्स २३१३ वरील चालकास त्याचे नाव गाव विचारता त्यांने त्याचे नाव २) सुरेश सुकदेव सोनवणे, वय ३८ वर्ष, रा. शिंगणापुर ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर असे असल्याचे सांगीतले. त्यास गाडीचे हौदयामध्ये काय आहे अशी विचारणा करता त्याने गाडीत वाळु भरलेली आहे असे सांगीतले. त्यावेळी त्यास वाळु वाहतुकीचे वैध परवानाविषयी विचारले असता त्याने वाळु वाहतुकीचा कुठलाही परवाना नसलेबाबत सांगीतले. तसेच सदरची वाळु कोठुन आणलेबाबत विचारणा केली असता त्यांनी सदरची वाळु गोदावरी पात्रातुन आणुन येथे स्टॉक केली असलेबाबत सांगतीले आहे. सदर आरोपींकडुन एक पिवळया रंगाचा ३ डी एक्स प्लस मॉडेलचा जेसेबी नं.एम.एच १७ डी.जे. ४५८० नंबरचा, एक टाटा कंपनीचा टिप्पर (डंपर) लाल रंगाची कॅबिन व पिवळा रंगाचा बॉडी असलेला ९०९ एच डी व ६ ब्रास वाळु असा एकुण २०,३०,०००/- रु.किं.चा मुददेमाल ताब्यात घेवुन जप्त करण्यात आला आहे. व वरील नमुद आरोपीं विरुध्द कोपरगाव तालुका पो.स्टे.गु.र.नं. ४५४/२०२६ भा.न्या. संहिता कलम ३०३ (२), ३(५), पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ चे कलम ३,१५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हे करत आहे.
सदरची कारवाई ही मा. मुम्मका सुदर्शन (भा.पो.से.) साो, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, अमोल भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी, संभाजी गायकवाड, पोलीस निरीक्षक कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर कार्यालयातील वाचक पोसई चारुदत्ता खोंडे, पोहेकॉ/सचिन धनाड, अनिल शेंगाळे, पोकों/ अक्षय भोसले तसेच कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार पोकों/ युवराज खुळे यांनी केली आहे.
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे श्रीरामपूर








