तुषार जाधव यांची मुंबई शहर पोलीस दलात निवड; पोलीस सेवेची परंपरा पुढे नेली


तुषार जाधव यांची मुंबई शहर पोलीस दलात निवड; पोलीस सेवेची परंपरा पुढे नेली

विशेष वृत्त :जिद्द, चिकाटी आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर तुषार जाधव यांनी पोलीस भरतीची कठीण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करत मुंबई शहर पोलीस दलात पोलीस शिपाईपदी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तुषार जाधव यांच्या कुटुंबाला पोलीस सेवेची गौरवशाली परंपरा लाभली आहे. त्यांचे वडील शशिकांत जाधव, काका रविकांत जाधव तसेच त्यांचे आजोबा यांनीही पोलीस अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. त्यामुळे कुटुंबातून मिळालेली सेवाभावाची प्रेरणा आणि वर्दीचा अभिमान तुषार यांच्या वाटचालीला निश्चितच बळ देणारा ठरला.
पोलीस भरतीच्या विविध टप्प्यांवर सातत्याने मेहनत घेत तुषार यांनी आपल्या ध्येयाचा पाठपुरावा केला. शारीरिक आणि लेखी परीक्षेत उत्तम कामगिरी करत त्यांनी मुंबई शहर पोलीस दलात स्थान मिळवले.
वर्दी परिधान करून देशाची आणि समाजाची सेवा करण्याचे त्यांचे स्वप्न अखेर साकार झाले आहे. विशेष म्हणजे, आपल्या कुटुंबातील पोलीस सेवेची परंपरा पुढे नेण्याचा मानही तुषार यांनी मिळवला आहे.
तुषार जाधव यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, पोलीस सेवेसाठी त्यांच्या पुढील वाटचालीस सर्वांकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!