विद्यार्थ्याच्या टक्कलवर शिक्षकाने वाजवला तबला; व्हिडिओ व्हायरल होताच निलंबन!
इटावा, उत्तर प्रदेश : विद्यार्थ्याच्या टक्कल केलेल्या डोक्यावर तबला वाजवल्याप्रमाणे हाताने थापा मारणाऱ्या शिक्षकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिक्षण विभागाने संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे.
उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यातील सैफई विकासखंडातील बिरौली येथील प्राथमिक शाळेत हा प्रकार घडला. संबंधित शिक्षकाचे नाव दिनेश कुमार माथूर असे असून, ते प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिक्षण विभागाने कारवाई करत या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
या घटनेमुळे शिक्षकांच्या वर्तनाबाबत आणि विद्यार्थ्यांच्या सन्मानाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
Views: 48






