मांजरी बुद्रुकमधील बेल्हेकर वस्तीत अनधिकृत बांधकामावर कारवाई; बहुमजली इमारतीचे पाडकाम


मांजरी बुद्रुकमधील बेल्हेकर वस्तीत अनधिकृत बांधकामावर कारवाई; बहुमजली इमारतीचे पाडकाम

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून मांजरी बुद्रुक येथील बेल्हेकर वस्ती परिसरात अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान जेसीबीच्या साह्याने एका बहुमजली इमारतीचे पाडकाम करण्यात आले.
महापालिकेच्या संबंधित विभागाने ही कारवाई केली. मात्र, संबंधित बांधकामाचे स्वरूप, कारवाईचे नेमके कारण आणि इमारतीच्या मालकाला यापूर्वी नोटीस बजावण्यात आली होती का, याबाबतची सविस्तर माहिती उपलब्ध झालेली नाही.
दरम्यान, घर किंवा सदनिका खरेदी करताना नागरिकांनी बांधकाम परवानगी, मंजूर नकाशा आणि मालमत्तेशी संबंधित कागदपत्रांची पडताळणी करावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


64
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!