आमदार निलेश राणेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी शिवसेना UBT शाखाप्रमुखाला अटक


आमदार निलेश राणेंवरील आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी शिवसेना UBT शाखाप्रमुखाला अटक

कुडाळ : शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपावरून साळगाव येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) पक्षाचे शाखाप्रमुख सचिन धुरी यांना कुडाळ पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरातून अटक केली.
एका डिजिटल न्यूज पोर्टलवरील बातमीच्या कमेंट सेक्शनमध्ये ही टिप्पणी करण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकारानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत पोलिसांत तक्रार दाखल केली. संबंधित प्रकरणाची दखल घेत कुडाळ पोलिसांनी रात्री उशिरा कारवाई करत सचिन धुरी यांना ताब्यात घेतले.
या घटनेमुळे कुडाळ परिसरातील राजकीय वातावरण तापले असून, या प्रकरणात पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रतिनिधी : उमेश कुलकर्णी
मो. ९८२२५४८४२९


66
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!