कार्तिक एकादशीनिमित्त पैठणच्या गंगा गोदावरी घाटावर भाविकांची मांदियाळी; श्री संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी


कार्तिक एकादशीनिमित्त पैठणच्या गंगा गोदावरी घाटावर भाविकांची मांदियाळी; श्री संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी मोठी गर्दी

पैठण प्रतिनिधी :कार्तिक एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पैठण येथील पवित्र गंगा गोदावरी नदीच्या घाटावर आज पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या भाविकांनी गंगा गोदावरी नदीमध्ये पवित्र स्नान करून भक्तिभावाने श्री संत एकनाथ महाराजांचे दर्शन घेतले.
कार्तिक एकादशीचे धार्मिक महत्त्व लक्षात घेता भाविकांनी पहाटेपासूनच घाटावर गर्दी केली होती. संपूर्ण घाट परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला होता. महिला, पुरुष, वृद्ध तसेच लहान मुलांनीही मोठ्या संख्येने उपस्थिती लावून धार्मिक विधी व दर्शनाचा लाभ घेतला.
यावेळी गंगा गोदावरी घाटावर भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा जयघोष आणि संत एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांची लागलेली रांग यामुळे पैठण नगरीत भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.
कार्तिक एकादशीच्या निमित्ताने पैठणच्या धार्मिक आणि आध्यात्मिक परंपरेचे दर्शन पुन्हा एकदा घडले.

योगेश धर्माधिकारी लोक1न्यूज पैठण


84
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!