नगरसेवक सागर गवळींच्या पुढाकारातून वाजवणे, देवाशीतील १०० कुटुंबांना मदतीचा हात


नगरसेवक सागर गवळींच्या पुढाकारातून वाजवणे, देवाशीतील १०० कुटुंबांना मदतीचा हात

नगरसेवक सागर गवळी यांच्या पुढाकारातून वाजवणे आणि देवाशी या दुर्गम गावांतील एकूण १०० गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यात आले. भाजपा नेते तथा भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येत असलेल्या ‘एक हात मदतीचा… माणुसकीच्या नात्याचा!’ या सेवाभावी उपक्रमांतर्गत गवळी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही गावांना भेट देऊन कुटुंबांपर्यंत मदत पोहोचवली.खेड, जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांतील दुर्गम भागात वाढदिवसानिमित्त मदत उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत सागर गवळी यांनी वाजवणे आणि देवाशी येथील गरजू आदिवासी कुटुंबांसाठी जीवनावश्यक साहित्याच्या वाटपाचे आयोजन केले. आमदार लांडगे यांच्या सामाजिक कार्यातून प्रेरणा घेत, कुटुंबांना घरात रोजच्या वापरासाठी उपयोगी पडेल असे साहित्य देण्यावर या उपक्रमात भर देण्यात आला.
प्रतिनिधी विजय अडसूळ


84
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!