बाईक टॅक्सी नियमावली रद्द करा; अनधिकृत सेवा कायमस्वरूपी बंद करा! पुणे रिक्षा चालक-मालक संघाची मागणी
पुणे रिक्षा मालक-चालक संघाचे परिवहन मंत्री आणि RTO प्रशासनाला निवेदन; २३ नोव्हेंबर रोजी निवेदन सादर
पुणे : रिक्षा आणि टॅक्सी व्यावसायिकांच्या रोजगारावर परिणाम करणारी ‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५’ ही नियमावली तात्काळ रद्द करावी, तसेच अनधिकृत बाईक टॅक्सी सेवा कायमस्वरूपी बंद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी पुणे रिक्षा मालक-चालक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी (दि. २३ नोव्हेंबर २०२६) परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.
राष्ट्रमाता माँ साहेब जिजाऊ पुरुष बचत गट संचलित पुणे रिक्षा मालक-चालक संघाचे अध्यक्ष राजेश ओव्हाळ यांच्या स्वाक्षरीने हे निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनाद्वारे राज्याचे परिवहन मंत्री, परिवहन आयुक्त, प्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच पुणे विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे बाईक टॅक्सी सेवांना परवानगी देण्यासंदर्भातील शासन निर्णय आणि ‘महाराष्ट्र बाईक टॅक्सी नियम, २०२५’ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.
रिक्षा आणि टॅक्सी व्यावसायिकांच्या प्रश्नांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, तसेच अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर कायमस्वरूपी बंदी घालून पारंपरिक प्रवासी वाहतूक व्यावसायिकांना न्याय द्यावा, अशी भूमिका संघटनेने निवेदनातून मांडली आहे.
प्रतिनिधी लोक 1न्यूज







