माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील शोरूममध्ये तिजोरी चोरीला!


माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेडमधील शोरूममध्ये तिजोरी चोरीला!

दोन चोरट्यांचा शोरूममध्ये प्रवेश; चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद, पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाकडून तपास सुरू
नांदेड : भाजप नेते आणि राज्यसभेचे खासदार, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नांदेड येथील ‘जया हुंडई’ शोरूममध्ये चोरीची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी (दि. २२ नोव्हेंबर) रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास दोन चोरट्यांनी शोरूममध्ये प्रवेश करून तिजोरी चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेमुळे नांदेड परिसरात खळबळ उडाली आहे. शोरूममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चोरीची संपूर्ण घटना कैद झाली असून, त्याआधारे चोरट्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. घटनास्थळाची पाहणी करून आवश्यक पुरावे गोळा करण्यात आले आहेत.
चोरट्यांनी नेलेल्या तिजोरीत नेमकी किती रक्कम किंवा मौल्यवान वस्तू होत्या, याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
पत्रकार : उमेश कुलकर्णी
संपर्क : ९८२२५४८४२९


84
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!