सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर बंदी घाला – अखिल भारतीय पेशवा संघटना पुणे*


*सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावर बंदी घाला – अखिल भारतीय पेशवा संघटना पुणे*

पुणे – काँग्रेस नेते सोनिया गांधी यांनी लिहिलेल्या बिलाँगिंग या बंदी घालण्याची मागणी अखिल भारतीय पेशवा संघटना पुण्याच्या वतीने करण्यात आली आहे. सदर पुस्तकात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल आक्षेपार्ह लिखाण असून काँग्रेस सातत्याने सावरकरांची बदनामी करून त्याचा राजकीय फायदा उचलण्याचा डाव खेळत आहे त्यामुळे समस्त सावरकर प्रेमी तथा हिंदुत्ववादी जनतेमध्ये क्षोभ असून कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. सदर पुस्तकावर तात्काळ बंदी घालून देशात हे पुस्तक कुठेही विक्री करता कामा नये अशा प्रकारची मागणी भारताच्या राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना ई-मेलवरून निवेदन पाठवून केली असल्याचे या वेळी सांगण्यात आले. आज निवेदन पाठवण्यापूर्वी डेक्कन येथील सावरकर स्मारकाची स्वच्छता करून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करू सावरकरांच्या चरणी नतमस्तक होऊन हा लढा सुरू करत असल्याचे अखिल भारतीय पेशवा संघटना चे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन वाडे पाटील यांनी सांगितले यावेळी हिंदू महा सभेचे कार्यवाह श्री मनोज तारे , परशुराम हिंदू सेवा संघ चे अध्यक्ष विश्वजित देशपांडे श्री तेजस तारे यांची उपस्थिती होती, या कार्यक्रमाचे आयोजन अखिल भारतीय पेशवा संघटना तर्फे करण्यात आले होते,

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी


84
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!