भोकरच्या कन्या प्रा. स्वाती कांबळे-शिंदे यांना इंग्रजी विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

टाकळीभान प्रतिनिधी-श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील कन्या तथा राहुरी येथील लोकनेते रामदासपाटील धुमाळ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाच्या उच्च माध्यमिक विभागातील इंग्रजी विषयाच्या प्राध्यापिका सौ. स्वाती कांबळे (शिंदे) यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून इंग्रजी विषयातील पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे त्यांना आता ‘डॉ. स्वाती कांबळे-शिंदे’ म्हणून ओळखले जाणार असून, भोकरसह श्रीरामपूर व राहुरी परिसरात त्यांच्या यशाचे कौतुक होत आहे.
प्रा. स्वाती कांबळे-शिंदे यांनी “A Sociolinguistic Perspective on Communicational Nuances in Select Novel of R. K. Narayan” या संशोधन विषयावर शोधप्रबंध सादर केला. त्यांच्या संशोधनाला सोनई महाविद्यालयाचे प्रा. डॉ. वर्पे यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांचे प्राथमिक शिक्षण हनुमानवाडी परिसरातील जिल्हा परिषद शाळेत, माध्यमिक शिक्षण भोकर येथील जगदंबा प्रासादिक विद्यालयात, तर उच्च माध्यमिक शिक्षण श्रीरामपूर येथील आर. बी. एन. बोरावके महाविद्यालयात झाले. त्यांनी स्वामी सहजानंद भारती कॉलेज ऑफ एज्युकेशन, श्रीरामपूर येथून बी.एड. पदवीही संपादन केली. ग्रामीण भागातील शैक्षणिक पार्श्वभूमी असतानाही उच्च शिक्षणाची जिद्द कायम ठेवत त्यांनी संशोधन क्षेत्रात हे यश मिळवले आहे. ग्रामीण भागातून शिक्षण घेत जिद्द, चिकाटी आणि परिश्रमांच्या जोरावर संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय क्षेत्रामध्ये मिळवलेले हे यश परिसरातील विद्यार्थिनींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन करण्यात येत आहे व त्यांच्या ग्रामस्थांच्या वतीने भावी नागरी सत्कार करण्यात येणार आहे,
प्रतिनिधी: दिलीप लोखंडे ,टाकळीभान,श्रीरामपूर .








