अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMCH) दोन इंटर्न डॉक्टरांना रुग्णाकडून मारहाण!


अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (GMCH) दोन इंटर्न डॉक्टरांना रुग्णाकडून मारहाण!

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात (GMCH) एका रुग्णाने दोन इंटर्न डॉक्टरांना मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाला अमली पदार्थांच्या सेवनाशी संबंधित समस्या असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून, डॉक्टरांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.

या घटनेच्या निषेधार्थ इंटर्न डॉक्टरांनी काम बंद आंदोलन सुरू केले असून, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

डॉक्टर रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी अहोरात्र सेवा देतात; मात्र कर्तव्य बजावत असताना त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कोण घेणार?

प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी आणि रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होत आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


84
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!