सावत्र पित्याकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप; सात वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू!


सावत्र पित्याकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप; सात वर्षीय चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू!
मुंबई : सावत्र पित्याकडून लैंगिक अत्याचार झाल्याचा कुटुंबीयांनी आरोप केलेल्या सात वर्षीय चिमुरडीचा KEM रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. काल ही दुर्दैवी घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीला चार दिवसांपूर्वी उपचारासाठी KEM रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना तिची प्राणज्योत मालवली. ही घटना शिळ-डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याची माहिती आहे.
दरम्यान, मुलीचा शवविच्छेदन अहवाल आणि अन्य वैद्यकीय अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. कुटुंबीयांनी केलेल्या आरोपांची सत्यता आणि घटनेमागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

प्रतिनिधी सिंथिया कोरिया


86
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!