ब्राह्मण महासंघाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार देशपांडे; महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. आशा जवाईरे वळसनकर


ब्राह्मण महासंघाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार देशपांडे; महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी सौ. आशा जवाईरे वळसनकर

लातूर : ब्राह्मण महासंघाच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार देशपांडे (अहमदपूर) यांची, तर लातूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षपदी सौ. आशा जवाईरे वळसनकर यांची निवड करण्यात आली आहे.

ब्राह्मण महासंघाचे मराठवाडा प्रदेशाध्यक्ष श्री. विलास शाळु यांनी आज लातूर येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून दोन्ही नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

यावेळी उत्तरादी मठ, लातूर येथे नियुक्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी पं. श्री रघु उत्तमाचार्य महाराज, पं. हेमंताचार्य गाडेकर महाराज, परिवहन महामंडळाचे सी. व. पंकज रमेशराव देशपांडे, सौ. जोशना देशपांडे आणि शामराव कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.

लातूर जिल्ह्यात ब्राह्मण महासंघाचे संघटनात्मक कार्य अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने लवकरच जिल्हा कार्यकारिणी तयार करण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष विलास शाळु यांनी दिली.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष विजयकुमार देशपांडे आणि महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष सौ. आशा जवाईरे वळसनकर यांचे ब्राह्मण महासंघ परिवाराच्या वतीने मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.

लातूर जिल्ह्यात ब्राह्मण महासंघाच्या संघटनात्मक विस्ताराच्या दृष्टीने या नियुक्त्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे.


86
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!