नामदार विख्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा ..


नामदार विख्यांच्या हस्ते विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा

टाकळीभान- प्रतिनिधी – श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील गावांतर्गत विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते आज रविवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सायं: ५ वाजता टाकळीभान ग्रामपंचायत च्या प्रांगणात संपन्न होणार आहे

या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती भाजपाचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,अप्पर पोलीस अधीक्षक, सोमनाथ वाकचौरे , प्रांत अधिकारी किरण सावंत, तहसीलदार मिलिंद कुमार वाघ महिला तालुकाध्यक्ष,सौ. रेखाताई रेंगे उत्तर उपजिल्हाध्यक्ष, भाजपा दिपक आण्णा पटारे , किरण सावंत प्रांत अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर, भाजपा तालुका अध्यक्ष बाबासाहेब चिडे, इंटरनॅशनल कबड्डी खेळाडू अस्लम इनामदार, इंटरनॅशनल कबड्डी खेळाडू शुवम पटारे , जिल्हा क्रीडा अधिकारी, ज्ञानेश्वर खुरंगे, माझी सभापती नानासाहेब पवार, अहिल्यानगर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत,

या विविध कामाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार असून तरी या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायतचे उपसरपंच कान्हा भाऊ खंडागळे यांनी केले आहे,

प्रतिनिधी:दिलीप लोखंडे,श्रीरामपूर


86
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!