जबलपूर बरगी धरण दुर्घटना: क्रूझ पलटली, अनेक बेपत्ता; वादळात पर्यटकांवर काळाचा घाला


जबलपूर बरगी धरण दुर्घटना: क्रूझ पलटली, अनेक बेपत्ता; वादळात पर्यटकांवर काळाचा घाला

जबलपूर (मध्य प्रदेश): बरगी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये पर्यटकांनी भरलेली क्रूझ अचानक आलेल्या तीव्र वादळात पलटल्याने भीषण दुर्घटना घडली. या घटनेत काही पर्यटकांचा मृत्यू झाला असून अनेक जण बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. बचाव पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असून बेपत्ता प्रवाशांचा शोध घेतला जात आहे.
प्राथमिक माहितीनुसार, जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे क्रूझचा तोल गेला. दुर्घटनेच्या वेळी क्रूझमध्ये मोठ्या संख्येने पर्यटक उपस्थित होते. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, मात्र काही जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.
व्हायरल व्हिडिओंमध्ये पर्यटकांचा आक्रोश, गोंधळ आणि जीव वाचवण्यासाठीची धडपड दिसून येत आहे. या घटनेनंतर लाईफ जॅकेट, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी आणि हवामानाचा अंदाज यांसारख्या सुरक्षाविषयक मुद्द्यांवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
जबलपूर प्रशासनाने दुर्घटनेची चौकशी सुरू केली असून बेपत्ता पर्यटकांचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफ व स्थानिक बचाव यंत्रणा कार्यरत आहेत. या दुर्घटनेमुळे बरगी धरण पर्यटन सुरक्षेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!