भाजप सरचिटणीस मधुकर बच्चे यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार
पिंपरी चिंचवड : भारतीय जनता पार्टी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा सरचिटणीस तथा ‘वुई टुगेदर फाऊंडेशन’चे अध्यक्ष मधुकर बहिरू बच्चे यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रविवार, ३ मे २०२६ रोजी आयोजित अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
वाढदिवसानिमित्त समाजातील विविध घटकांना मदत करण्याच्या उद्देशाने अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. वृद्धाश्रमात जीवनावश्यक किराणा मालाचे वाटप करून गरजूंना मदतीचा हात दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून संगणक वाटप करण्यात येणार असून विविध ठिकाणी प्रथमोपचार पेट्यांचे वाटपही केले जाणार आहे. तसेच वृद्धाश्रम, अनाथ आश्रम आणि बाल अनाथ आश्रमांना विशेष मदत दिली जाणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने घरकाम व बिगारी काम करणाऱ्या महिलांना साड्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
हा अभिष्टचिंतन सोहळा रविवार, ३ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता राजमाता जिजाऊ उद्यान, आंजलीबाई ठोके सभागृहाच्या शेजारी, पोदार शाळेमागे, काकडे पार्क, चिंचवड येथे पार पडणार आहे.
या कार्यक्रमासाठी पै. गणेश पोपट बच्चे, मधुकर बच्चे युवा मंच, चैतन्य फार्मा ग्रुप तसेच भाजप प्रभाग १८ मधील माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी निमंत्रक म्हणून नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429










