भोर तालुका हादरला! नसरापूरमध्ये ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर खून; चेलाडी येथे पुणे-सातारा महामार्ग २ तास रोखला


भोर तालुका हादरला! नसरापूरमध्ये ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचारानंतर खून; चेलाडी येथे पुणे-सातारा महामार्ग २ तास रोखला

नसरापूर (भोर तालुका), दि. २ मे २०२६ – पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे अवघ्या ३ वर्षीय चिमुकलीवर ६० वर्षीय नराधमाने अत्याचार करून तिची हत्या केल्याच्या संतापजनक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. या अमानुष घटनेनंतर नागरिकांचा संताप अनावर झाला असून, चेलाडी येथे पुणे-सातारा महामार्गावर तब्बल दोन तास रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.
घटनेची माहिती समोर येताच स्थानिक नागरिक, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा द्यावी, तसेच पीडित कुटुंबाला तातडीने न्याय मिळावा, या मागणीसाठी नागरिकांनी महामार्ग रोखून तीव्र निषेध व्यक्त केला.
परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानंतर पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी नागरिकांशी संवाद साधत आरोपीवर कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
दरम्यान, आरोपी मुलीला नेत असतानाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्याने नागरिकांमध्ये संताप आणखी वाढला आहे. या धक्कादायक दृश्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून, आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी जोरदार मागणी होत आहे.
पोलीसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
नागरिकांनी शांतता राखून कायदेशीर मार्गाने न्याय मिळवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


26
कृपया वोट करा

लोक1 न्यूजच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

हे देखील पहा...

error: Content is protected !!